Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T06:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यूपीएससीतर्फे नागरी सेवा परीक्षेची उत्तरतालिका जाहीर Rojgar News

Advertisement
UPSC 2020: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे , सीएसईसाठी अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. पेपर १ आणि पेपर २ साठी अधिकृत प्राथमिक उत्तरतालिका आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका तपासू शकतात. पूर्व परीक्षेच्या यूपीएससी उत्तरतालिकेची अनेक उमेदवार वाट पाहत होते. आयोगाने पेपर १ आणि २ च्या चारही संचांसाठी उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. CSE पूर्व २०२० परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात आले आणि त्यानंतर मुलाखत फेरी घेण्यात आली. यूपीएससी पूर्व परीक्षेची उत्तरतालिका तपासण्यासाठी बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉले करा. तसेच उमेदवारांना संदर्भासाठी CSE पूर्व २०२० प्रश्नपत्रिकेची लिंक देखील देण्यात आली आहे. UPSC Answer key 2020: अशी तपासा परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in.ला भेट द्या. होमपेजवर, 'Exam' असे लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा आणि नंतर 'Answer Key' वर क्लिक करा. नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका असलेले एक नवीन पेज उघडेल. वेगवेगळ्या PDF फाईल्स उघडतील. स्क्रोल करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. भविष्यातील संदर्भासाठी याची प्रिंट काढा. UPSC CSE मुख्य परीक्षेचा निकाल २४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर झाला. यामध्ये ७६१ विद्यार्थ्यांनी टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. बिहारचा शुभम कुमार एआयआर १ सह २०२१ मध्ये आयएएस टॉपर बनला. यूपीएससी प्रिलिम्स २०२१ परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी करोना केसेस कमी झाल्यानंतर आयोजित करण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wyMtV5
via nmkadda