Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-25T07:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कृषी पदवी प्रवेशांकडे विद्यार्थ्यांची पाठ; नोंदणी घटली Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रियेची मुदत संपली असून, तात्पुरती गुणवत्ता यादी २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यंदा ३२ हजार ९५५ विद्यार्थी कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा हजाराने नोंदणी संख्या घटली आहे. बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमाला नोंदणी कमी असल्याची माहिती कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतील सूत्रांनी दिली. कृषी अभ्यासक्रमांच्या तासिका २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्यातील चार राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध नऊ विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (Maharashtra , Pune, MCAER) प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार सीईटी निकालानंतर ५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. राज्यातील १९१ महाविद्यालयांमधील १५ हजार ३३७ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल काहीसा कमी झाल्याचे सांगण्यात येते. यंदा बारावीचा निकाल सर्वाधिक लागला असतानाही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. नोंदणीला मुदतवाढ देऊनही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ३२ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी ३८ हजार ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. नोंदणीनंतर आता विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. तासिका २७ डिसेंबरपासून कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाच्या तीन फेरी असणार आहेत. त्यासह एक स्पॉट अॅडमिशन फेरी असणार आहे. डिसेंबरमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रथम वर्षाच्या तासिका २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्यातील विविध चार कृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये बीएससी ऑनर्स कृषी, बीएससी ऑनर्स उद्यानविद्या, बीएससी ऑनर्स वनविद्या, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान, बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीएफएससी मत्स्यशास्त्र, बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदी पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक तात्पुरती गुणवत्ता यादी : २६ नोव्हेंबर यादीबाबत आक्षेप नोंदविणे : २७ ते २९ नोंव्हेंबर अंतिम गुणवत्ता यादी : ३ डिसेंबर पहिल्या फेरीची वाटप यादी : ६ डिसेंबर रिपोर्टिंग कालावधी : ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर दुसऱ्या प्रवेश फेरीची वाटप यादी : ११ डिसेंबर रिपोर्टिंग कालावधी : १३ डिसेंबर ते १४ डिसेंबर तिसऱ्या प्रवेश फेरीची वाटप यादी : १८ डिसेंबर रिपोर्टिंगचा कालावधी : २० ते २१ डिसेंबर रिक्त जागांकरिता 'जागेवर प्रवेश फेरी' : २७ ते ३० डिसेंबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज... : ७३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज : ३७ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज : ५४ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज : २७ एकूण पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालय : १९१ एकूण पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता... : १५३३७ शासकीय महाविद्यालय संख्या...... : ३७ अनुदानित महाविद्यालय संख्या...... : २ विना अनुदानित महाविद्यालय संख्या : १५२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l6M1Jh
via nmkadda