Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-11-27T09:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ऑइल इंडियामध्ये विविध पदांची भरती; परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Oil India Recruitment: लिमिटेड (Oil India)तर्फे कनिष्ठ सहाय्यक भरती २०२१ (junior Assistant Recruitment 2021) केली जात आहे. यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येत होते. आता या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आली आहे. ऑइल इंडिया ज्युनियर असिस्टंट भरती २०२१ परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. Oil India : असे करा डाऊनलोड ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाइट oil-india.com वर जा. होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा. नवीन पेज उघडेल. येथे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. उमेदवार लॉगिन पेज खुले होईल. येथे तुमचा ऑइल इंडिया ज्युनियर असिस्टंट अर्ज क्रमांक, नाव आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर तुमचे ऑइल इंडिया भरतीचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्रावरील सर्व माहिती नीट वाचा. काही त्रुटी आढळल्यास, ताबडतोब ऑइल इंडिया कार्यालयाशी संपर्क साधा आणि प्रवेशपत्र दुरुस्त करून घ्या. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि जपून ठेवा. कारण परीक्षेला बसण्यासाठी हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर माध्यमातून घेतली जाणार आहे. या भरती परीक्षेद्वारे ऑइल इंडिया, ज्युनिअर असिस्टंट (लिपिक सह संगणक ऑपरेटर) ची १२० पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑइल इंडियातर्फे जुलै २०२१ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली.१५ ऑगस्ट २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. या पदावर अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारासाठी २०० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले. तर अनुसूचित जाती/जमाती/ईडब्ल्यूएस/दिव्यांग/माजी सैनिकांना अर्जामध्ये सवलत देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nVe3ZS
Source https://ift.tt/310mqee