Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-30T07:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील ६२२९ रिक्त जागा भरणार Rojgar News

Advertisement
Recruitment: विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, संस्था आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात देशातील विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, असे यूजीसीने म्हटले आहे. यूजीसीने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, फॅकल्टी (प्राध्यापक) कायमस्वरूपी नियुक्त्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली विद्यापीठात (DU) १ एप्रिलपर्यंत विविध विभागांमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरची सुमारे ८४६ पदे रिक्त आहेत. तसेच देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये एकूण ६२२९ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यापैकी १०१२ या एससीसाठी, ५९२ एसटीसाठी, १७६७ इतर मागासवर्गीय (OBC), ८०५ इडब्ल्यूएस आणि ३५० दिव्यांग प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. तसेच उर्वरित सामान्य श्रेणीतील पदे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली विद्यापीठासह ४४ केंद्रीय विद्यापीठांपैकी १५ विद्यापीठांमध्ये मंजूर शिक्षकांच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. अलाहाबाद युनिव्हर्सिटी आणि ओडिशा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकांच्या ७० टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. शिक्षणमंत्र्यांकडून सूचना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सप्टेंबर महिन्यात ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पदभरती संदर्भात सूचना दिल्या होत्या. प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संस्थांनी वेगाने काम करावे, असे ते म्हणाले होते. याअंतर्गत सर्व विद्यापीठांनी पुढील आठवड्यात आरक्षित संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात द्यावी असेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना नवीन बदल स्वीकारण्याची पूर्ण स्वायत्तता तुम्हाला असेल असे धर्मंद्र प्रधान यांनी कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत म्हटले. एनईपीनुसार या वर्षापासूनच नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. दरम्यान, अनेक केंद्रीय विद्यापीठांनी या दिशेने उचललेल्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले. मार्गदर्शक तत्त्वे जाहीर यूजीसीच्या सेक्रेटरींनी ४ जून २०१९ रोजी युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसच्या फॅकल्टीमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिले होते. सर्व विद्यापीठे, मानद विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये नियुक्तीसाठी यूजीसी शिक्षक नियुक्ती प्रक्रियेचा अवलंब करून त्यांनी या संदर्भात पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D7sHS0
Source https://ift.tt/310mqee