TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्र सरकारी नोकरीची संधी; अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीत भरती Rojgar News

Notification: जर तुम्ही अॅग्रीकल्चरमध्ये बीएससी किंवा मग हॉर्टिकल्चरमध्ये बॅचलर डिग्री मिळवली असेल तर तुमच्यासाठी सरकार नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (Agriculture Insurance Company of India Limited, AICL) ने मॅनेजमेंट ट्रेनी आणि हिंदी ऑफिसर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण ३० पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना AIC च्या ऑफिशियल वेबसाइट aicofindia.com वर जाऊन तपशील भरावे लागतील. यातील मॅनेजमेंट ट्रेनी पदांवरील भरती अॅग्रीकल्चर सायन्स, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि लीगल सेक्शन मध्ये होईल. अॅग्रीकल्चर सायन्स मॅनेजमेंट ट्रेनी पदांवरील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बीएससी (कृषी)/बीएससी (बागकाम) किंवा बीई /बीटेक इन अॅग्रीकल्चर इंजीनियरिंग मध्ये किमान ६० टक्के गुण असायला हवेत. इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स /आयटी) पदवीधर असावेत. लीगल सेक्शनमधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे लॉ मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असायला हवी. अकाउंट्स मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार बीकॉम, एमकॉम, चार्टर्ड एकाउंटंट (ICAI), कंपनी सेक्रेटरी (ICSI), कॉस्ट एंड मॅनेजमेंट अकाउंटेट (Cost and Management Accountant) किंवा MBA (फायनान्स ) केलेले असावेत. या व्यतिरिक्त हिंदी ऑफिसर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पात्रतेच्या अटींविषयी अधिक माहिती पाहू शकतात. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे. शुल्क सामान्य, ओबीसी, EWS पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC / ST / PH उमेदवारांना २०० रुपये शुल्क द्यावे लागेल. निवड प्रक्रिया अॅग्रीकल्चर इंश्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे जारी नोटिफिकेशननुसार उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा जानेवारी, २०२२ मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेची योग्य तारीख नोंदणीकृत उमेदवारांना लवकरच कळवण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lcZWxr
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या