Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-26T10:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

६६ हजार उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेला गैरहजर; काय कारण?... वाचा Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला () ६६ हजारांपेक्षा अधिक उमेदवार अनुपस्थित राहिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक सात हजार ७६६ उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत. एसटी संपामुळे ग्रामीण भागांतील अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, तर काहींना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध न झाल्याने परीक्षाच देता आली नाही. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा परिषदेतर्फे दोन वर्षांनंतर टीईटी परीक्षा घेण्यात आली. 'टीईटी'च्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी परीक्षेला दोन लाख १६ हजार ६०४ उमेदवारांनी हजेरी लावली, तर ३७ हजार ८२४ उमेदवार अनुपस्थित होते. पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी एक लाख ८५ हजार ४३९ उमेदवार परीक्षेला हजर होते, तर २८ हजार ८१२ उमेदवार गैरहजर होते. पेपर एक आणि दोन मिळून चार लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार लाख २ हजार ४३ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ६६ हजार ६३६ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात ४० हजार ९० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी ३२ हजार ३२४ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी सात हजार ७६६ उमेदवार गैरहजर राहिल्याचे दिसून येत आहे. एसटी संपामुळे यंदाच्या परीक्षेत अनुपस्थितांचा टक्का वाढल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DYeKXS
via nmkadda