बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे- वर्षा गायकवाड Rojgar News

बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे- वर्षा गायकवाड Rojgar News

मुंबई: बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री यांनी केले. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांप्रमाणेच शिक्षकांनीही अमूल्य काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन एस. आर. दळवी फाऊंडेशकडून या कोरोनायोद्धे शिक्षकांचा समसंग टॅब व महाशिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनाकाळात आपल्या सर्वांसमोर एक आव्हात्मक परिस्थिती उभी ठाकली होती पण त्या परिस्थीतीकडे शिक्षकांनी एक संधी म्हणून पाहिले. राज्याच्या विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणात खंड पडू न देता शिक्षण सुरुच ठेवले असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. करोना काळात शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबला. परंपरागत शिक्षणाचा जागी तंत्रज्ञानाने घेतली पण शिक्षणाची गंगा सुरुच ठेवली असेही त्या म्हणाल्या. शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळाप्रमाणे बदल होत आहेत. आपली स्पर्धा वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांच्या फक्त इमारती आणि पायाभुत सुविधा देऊन चालणार नाही तर त्यातील शिक्षकाने सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे लागणार असल्याचे आवाहन वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले. शालेय शिक्षण विभाग हा क्रांती करणारा विभाग आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे आणि प्रगतच राहिल यासाठी पण बदल स्विकारावेत, नवीन कल्पना,संकल्पाना शिक्षण क्षेत्रात आणल्या पाहिजेत. जे शिक्षण नवीन प्रयोग करतील त्याची नक्कीच दखल घेतली जाईल असेही त्या म्हणाल्या. आणि सॅमसंग टॅब देऊन सन्मान कोराना काळात शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी या भावनेतून एस. आर. दळवी फाऊंडेशनने शिक्षकांच्या कार्याला योग्य न्याय देण्यासाठी हा पुरस्कार देण्याचा विचार केला. यासाठी १५८ नामांकने आली होती त्यातून ज्युरींनी ७ शिक्षकांना महाशिक्षक पुरस्कार व सॅमसंग टॅब देऊन सन्मान करणे आणि आणखी ५ शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एस. आर. दळवी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र दळवी यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qzKrDa
via nmkadda

0 Response to "बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे- वर्षा गायकवाड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel