
School Rankings 2021: 'या' सरकारी शाळेचा देशात पहिला नंबर, वाचा यादी Rojgar News
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१
Comment

2021: एज्युकेशन वर्ल्डतर्फे १५ व्या वार्षिक भारत शाळा रँकिंग सर्वेक्षण २०२१-२२ जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, सेक्टर १० या शाळेला देशातील सरकारी शाळांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील चार शाळांचा देशातील टॉप १० सरकारी शाळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीकरांचे कौतुक करत ट्वीटरवर ही माहिती दिली. एज्युकेशन वर्ल्डने १५ व्या इंडिया स्कूल रँकिंग सर्वेक्षण २०२१-२२ मधून देशातील सरकारी शाळांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेल्या इतर तीन शाळांमध्ये राजकीय प्रतिभा विकास विद्यालय सेक्टर ११, रोहिणी, दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, सेक्टर ५, द्वारका, दिल्लीला आठवा क्रमांक मिळाला आहे. राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, यमुना विहार, दिल्ली नवव्या क्रमांकावर आहे. 'देशभरातील सरकारी शाळांच्या रेटिंगमध्ये दिल्लीची सरकारी शाळा पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच टॉप १० पैकी चार शाळा दिल्लीतील आहेत. दिल्लीचे अभिनंदन. दिल्लीच्या टीम एज्युकेशनचेही अभिनंदन', असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले. चार केंद्रीय विद्यालये पहिल्या दहामध्ये दिल्लीच्या सरकारी शाळांव्यतिरिक्त, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटनेच्या देशभरातील चार केंद्रीय विद्यालयांना देशातील सरकारी शाळांच्या पहिल्या १० क्रमवारीत स्थान मिळाले आहे. त्यापैकी केंद्रीय विद्यालय आयआयटी मद्रास, चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय विद्यालय पट्टम, तिरुवनंतपुरम तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर केंद्रीय विद्यालय आयआयटी पवई, मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामध्ये केंद्रीय विद्यालय क्रमांक २ नेव्हल बेस, कोचीन सातव्या स्थानावर आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेच्या १४ मापदंडांवर आधारित संपूर्ण भारतातील ३ हजार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. याअंतर्गत २८ शहरांमधून ११ हजार ४५८ पालक, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारुन अंतिम निष्कर्ष काढण्यात आला. एज्युकेशन वर्ल्ड इंडियाने सीएफओ दिल्लीच्या सहकार्याने १५ वे एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग सर्वेक्षण आयोजित केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oBOc8E
via nmkadda
0 Response to "School Rankings 2021: 'या' सरकारी शाळेचा देशात पहिला नंबर, वाचा यादी Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा