Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-29T09:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

School Reopening Update: शाळांसाठी कोणते करोना प्रतिबंधात्मक नियम? वाचा... Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने करोना प्रतिबंधात्मक सूचनांची नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील सर्व शाळांनी या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य करणे, दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करणे, अशा सूचनांचा या नियमावलीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यात एक डिसेंबरपासून प्राथमिक इयत्तांच्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी आरोग्य विभागाने शाळांसाठी नियमावली जाहीर केली. करोनापासून बचाव करण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी, याबाबत सविस्तर नियम या नियमावलीत नमूद करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहणार आहे; तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शाळेचा परिसर जर करोना काळजी केंद्रासाठी वापरण्यात आला असेल; तर त्याची तातडीने स्वच्छता करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांसाठीही आरोग्य विभागाने काही सूचना दिल्या असून, वर्गात बसताना विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये किमान सहा फूटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे एकत्रित कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशाही सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे शाळा जरी सुरू होत असल्या, तरी सामूहिक प्रार्थना, सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना मज्जाव करण्यात आला आहे. शाळांसाठीची नियमावली १. शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा. २. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. ३. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत. ४. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, फेस मास्क याचा पुरवठा करावा. ५. शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी गर्दी करणार नाहीत, याची शाळांनी काळजी घ्यावी. विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना १. विद्यार्थ्यांनी शाळेत इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्र येऊ नये. २. पालकांनी विद्यार्थ्यांना वाहनांमधून शाळेत पाठवताना वाहनांचे निर्जंतुकीकरण केले आहे की नाही, हे तपासून पाहावे. ३. विद्यार्थ्यांनी सामूहिक खेळ खेळू नयेत. ४. शाळेत एकत्र येऊन डबा खाण्यास, जेवण्यास सक्त मनाई


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lgGX53
Source https://ift.tt/310mqee