UPSC मुख्य परीक्षा जानेवारीत, वेबसाइटवरुन डाऊनलोड करा DAF Rojgar News

UPSC मुख्य परीक्षा जानेवारीत, वेबसाइटवरुन डाऊनलोड करा DAF Rojgar News

2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ ही जानेवारी २०२२ मध्ये होणार आहे. आयोगाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ ही ७ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. यासाठी डिटेल्स अॅप्लीकेशन फॉर्म () यूपीएससीतर्फे जाहीर केला जाणार आहे. आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भातील नोटीस जाहीर करण्यात आली आहे. यूपीएससीने नागरी सेवा २०२१ च्या अधिकृत नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया केवळ ऑनलाइन असणार आहे. यासाठी तुम्हाला डिटेल अॅप्लिकेशन फॉर्म-१(UPSC DAF 1) भरावा लागेल. डीएएफ भरताना उमेदवाराने आपली जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल. परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. DAF काय आहे? UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी (UPSC Civil Services)वेगवेगळ्या स्तरावर अर्ज भरले जातात. उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी आधी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एक फॉर्म भरावा लागेल. याला तपशीलवार अर्ज फॉर्म (UPSC DAF 1) म्हणतात. यासोबतच परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी यूपीएससी डिएएफ २ भरावे लागेल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मुलाखतीसाठी DAF मध्ये उमेदवारांना IAS, IPS, IFS किंवा इतर सेवांमधील त्यांचे प्राधान्य विचारले जाते. यावेळी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सर्व कागदपत्रांच्या प्रती पुन्हा अपलोड कराव्या लागतील. DAF कधी सोडले जाईल? UPSC कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य परीक्षेचा तपशीलवार अर्ज लवकरच जाहीर केला जाणार आहे. नोव्हेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात फॉर्मची लिंक सक्रिय होण्याची शक्यता आहे. यूपीएससीने यासाठी कोणतीही विशिष्ट तारीख दिलेली नाही. नियमित अपडेट्ससाठी UPSC वेबसाइट upsc.gov.in ला भेट देत रहा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cfNJD5
via nmkadda

0 Response to "UPSC मुख्य परीक्षा जानेवारीत, वेबसाइटवरुन डाऊनलोड करा DAF Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel