TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतीय सैन्यांत सेवेचं स्वप्न: 10 वी व 12 वी उत्तीर्णांसाठी संधी, 63 हजारांपर्यंत वेतन Rojgar News

Indian-Army

नवी दिल्ली : भारतीय लष्करात सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने वर्ष 2022 साठी आर्टिलरी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्याच्या नाशिक आर्टिलरी सेंटरने जारी केलेल्या अधिसूचनेत स्वयंपाकी, फायरमॅन तसेच अन्य पदांचा यामध्ये समावेश आहे. इच्छुक उमेदवार indianarmy.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेऊ शकतात. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे मागील जाहिरातीतेवेळी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज दाखल करावा लागणार आहे. सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 22 जानेवारी 2022 असणार आहे.

कोणत्या पदासांठी किती जागा?

नाशिक आर्टिलरी विभागाने संरक्षण नागरी पदांच्या 107 जागांसाठी अर्ज मागितले आहे. पदनिहाय जागांची संख्या पुढीलप्रमाणे-

o लोअर डिव्हिजन क्लर्क (27)
o मॉडेल मेकर (01)
o स्वयंपाकी (02)
o रेंज लास्कर (08)
o फायरमॅन (01)
o आर्टी लास्कर (07)
o नाभिक (02)
o धोबी (03)
o घोडेवाला (01)
o मल्टि टास्किंग स्टाफ (46)
o सामग्री दुरुस्तीकार (01)
o एमटीएस लास्कर (06)
o कारपेंटर (02)

कुणाला किती वेतन?

आर्टिलरी सेंटरमध्ये पदनिहाय वेतन भिन्नता आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमॅन आणि स्वयंपाकी यांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये पर्यंत वेतन अदा केले जाईल. सामग्री दुरुस्तीकार, न्हावी, एमटीएस, घोडेवाला, धोबी, एमटीएस (माळी), एमटीएस (पहारेकरी ) यांना 8,000- 56,900 रुपये वेतन मिळेल.

भारतीय सैन्य आर्टिलरी भरती 2022 पात्रता निकष:

जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी स्वतंत्र पात्रता आणि वय नमूद करण्यात आले आहे. किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे. संबंधित पदानुसार उमेदवारांना 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारावर पुढील निवड प्रक्रियेला साठी उमेदवारांचे अर्ज निवडले जातील. भारतीय सैन्याच्या आर्टिलरी भरती 2022 विषयी अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

संबंधित बातम्या :

ESIC Recruitment : ईएसआयसीमध्ये 3600 पदांची जम्बो भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Police Recruitment | पोलीस दलात मेगाभरती, 50 हजार पदं भरणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती

2 जानेवारीला होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षा किती तारखेला होणार?


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: भारतीय सैन्यांत सेवेचं स्वप्न: 10 वी व 12 वी उत्तीर्णांसाठी संधी, 63 हजारांपर्यंत वेतनhttps://ift.tt/321G0a8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या