AISSEE 2022: सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NTA कडून महत्वाचे निर्देश

AISSEE 2022: सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NTA कडून महत्वाचे निर्देश

2022: ऑल इंडिया सैनिक स्कूल एक्झाम फॉर्म () भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने परीक्षेच्या शहराचे तपशील प्रसिद्ध केले आहेत. या परीक्षेला बसणारे सर्व वर्गातील विद्यार्थी च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लिंक डाउनलोड करु शकतात. AISSEE परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. उमेदवारांना aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अपडेट पाहण्याची सूचना करण्यात आली आहे. AISSEE २०२२ परीक्षा ९ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी देशभरातील १७६ शहरांमध्ये NTA पेपर पेन मोडमध्ये आयोजित केली जाईल. सैनिक शाळांमध्ये ६ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (AISSEE) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असतील. अंतिम निवड शाळानिहाय, वर्गवार, श्रेणीनिहाय रँक, प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीत, सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंजूर केलेली मेडिकल फिटनेस आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित आहे. AISSEE 2022: Exam City साठी पुढील स्टेप्स फॉलो करा ज्या उमेदवारांनी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरला आहे त्यांनी शाळा प्रवेश परीक्षेची अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर जा. होमपेजवर, 'AISSEE 2022 साठी परीक्षा शहर सूचना' असलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमची लॉगिन क्रेडेंशियल्स म्हणजेच अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरा. आता परीक्षेच्या शहरासाठी तुमची माहिती यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. परीक्षेच्या दिवशी नेण्यासाठी एक प्रिंट डाउनलोड करा आणि प्रिंट करा. देशभरातील ३३ सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी AISSEE परीक्षा ९ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाणार आहे. हे प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र नाही. ही फक्त परीक्षा केंद्र कुठे असेल त्या परीक्षा शहराची माहिती आहे. एनटीएने उमेदवारांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जाहीर केला आहे. या अंतर्गत, कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, विद्यार्थी एनटीएशी ०११-४०७५ ९००० वर संपर्क साधू शकतात किंवा aissee@nta.ac.in वर ई-मेल पाठवू शकतात. इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा १५० मिनिटांची असेल. जी दुपारी २ ते ४.३० या वेळेत चालेल. तर इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा १८० मिनिटांची असेल. ती दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत चालेल. परीक्षा पेन पेपर पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन अर्ज सहावी आणि नववीला प्रवेश घेताना ऑनलाइन नोंदणीसाठी तुमचा युनिक आयडी आणि मोबाईल नंबर वापरून https://ift.tt/37jXO0B या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करा. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरा आणि सिस्टम जनरेटेड अर्ज क्रमांक नोंदवा. आता कागदपत्रे अपलोड करा. यानंतर उमेदवाराच्या छायाचित्रे जेपीजी/जेपीईजी स्वरूपात (फाइल आकार: १० केबी - २०० केबी) असावी. तसेच JPG/JPEG स्वरूपात उमेदवाराची स्वाक्षरी (फाइल आकार: ४केबी - ३०केबी)आवश्यक आहे. आता उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यावा. (फाइल आकार १० KB-५० KB) JPG/JPEG स्वरूपात. जन्मतारखेचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र, सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी) आणि माजी सैनिकांसाठी PPO लागू असेल. त्यानंतर SBI, ICICI बँक, पेटीएम पेमेंट गेटवे वापरून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे शुल्क भरा आणि भरलेल्या शुल्कासह संपूर्ण फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.


source https://maharashtratimes.com/career/career-news/aissee-2022-nta-issued-information-for-students-filling-the-form-for-admission-in-sainik-schools-parents-must-also-check/articleshow/88355610.cms

0 Response to "AISSEE 2022: सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NTA कडून महत्वाचे निर्देश"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel