Bank job 2021: युनियन बॅंकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

Bank job 2021: युनियन बॅंकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

Recruitment 2021: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union bank of india Recruitment 2021) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणि अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत सिनीअर एक्झिक्युटिव्ह/ डोमेन एक्सपर्ट (Senior Executive/ Domain Expert) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. युनियन बॅंकेच्या आस्थापनेवर (Union Bank Administration) विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यात येणार आहेत. मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer), मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer), प्रमुख – विश्लेषण (Chief - Analysis), मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor), प्रमुख – API व्यवस्थापन (Chief - API Management), प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिन टेक (Chief - Digital Debt and Fin Tech)पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. चीफ रिस्क ऑफिसर पदासाठी उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२१ रोजी ३५ ते ५५ वर्षांपर्यंत असावे. तर इतर सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय ३५ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या पदभरतीमध्ये कोणत्याही जागा राखीव ठेवण्यात आल्या नाहीत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia वर पाठवायचा आहे उमेदवार दिनांक २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज पाठवू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार मिळणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, कामाचे स्वरुप याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. मुलाखतीच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. मुलाखतीचे कॉल लेटर उमेदवारांना अधिकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात येईल. यासाठी कोणती हार्ड कॉपी पाठविण्यात येणार नाही. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर बॅंकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी युनियन बॅंकेच्या मुंबईतील कार्यालयासाठी होणार आहे. पण बॅंकेला गरज वाटल्यास इतर ब्रॅंचमध्ये पाठविले जाऊ शकते. अर्ज आणि अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु झाली असून २९ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dzF7YJ
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Bank job 2021: युनियन बॅंकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel