Bank Job 2021: अभ्युदय सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी

Bank Job 2021: अभ्युदय सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी

Abhyudaya 2021: सहकारी बँकेत नोकरीच्या (Co-operative Bank Job) शोधात असलेल्या इच्छुकांसाठी महत्वाची बातमी आहे. अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडने (Abhyudaya Co-operative Bank Recruitment) मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बँकेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, मॅनेजमेंट ट्रनी पदांच्या १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांच्या संख्येत वाढ देखील केली जाऊ शकते. पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेची अधिकृत वेबसाइट abhyudayabank.co.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करता येणार आहे. अभ्युदय सहकारी बँकेतील मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे. यासोबतच CA/CFA किंवा MBA/MMS/PGDBM पूर्णवेळ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १ डिसेंबर २०२१ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म १ डिसेंबर १९८६ पूर्वी झालेला नसावा आणि १ डिसेंबर १९९१ नंतर झालेला नसावा. सरकारी नियमांनुसार एससी, एसटी, ओबीसी आणि एनटी श्रेणीच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च मर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. याचा अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना ३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क देखील भरावे लागेल. ३ जानेवारी ही अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/bank-job-2021-abhyudaya-co-operative-bank-invites-applications-for-the-post-of-management-trainee-bank-jobs-for-graduates/articleshow/88319442.cms

0 Response to "Bank Job 2021: अभ्युदय सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel