Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-12-21T13:00:50Z
Rojgar

Bank Job: सारस्वत बॅंकेत भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

Advertisement
Recruitment 2021: बँकेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सारस्वत बॅंकेच्या माध्यमातून कामाची संधी मिळणार आहे. सारस्वत बॅंकेने पदवीधरांना नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. सारस्वत बॅंकेमध्ये (Sarswat ) कनिष्ठ अधिकारी (Junior Officer Vacancy) पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्युनिअर ऑफिसर्स मार्केटिंग अॅण्ड ऑपरेशन (क्लरीकल कॅडर) (Junior Officers Marketing and Operations) पदांसाठी ही भरती होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई एमएमआरडीए आणि पुणे विभागात नियुक्ती दिली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. त्याच्याकडे बॅंक, सबसिडी ऑफ बॅंक/ एनबीएफसी/ डिएसए/क्रेडीट सोसायटी याचा किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२१ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असावा. त्याच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असावे. स्थानिक उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2SEg3Zg वर जावे. तिथे देण्यात आलेला ऑनलाइन अर्ज भरावा. यासाठी २२ डिसेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बॅंकेच्या नियमांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/saraswat-bank-recruitment-2021-various-post-vacant-in-saraswat-bank-opportunity-for-graduates/articleshow/88412516.cms