Bipin Rawat यांचे 'हे' स्वप्न अपूर्ण, नातेवाईकांनी केला खुलासा Rojgar News

Bipin Rawat यांचे 'हे' स्वप्न अपूर्ण, नातेवाईकांनी केला खुलासा Rojgar News

नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (CDS ) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या साहसाच्या अनेक आठवणी सांगितल्या जात आहेत. दरम्यान बिपिन रावत यांना एक सैनिकी शाळा बांधायची होती ही माहिती देखील पुढे येत आहे. जनरल रावत यांनी जानेवारी २०२१ मध्ये शहडोलला भेट दिल्यानंतर तेथे सैनिकी शाळा बांधण्यासाठी पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले होते. दिवंगत जनरल रावत यांचे शहडोल येथे सासर आहे. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी झालेल्या अपघातात जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टरमधील अन्य ११ जणांचा मृत्यू झाला. १९८६ मध्ये शहडोल जिल्ह्यातील सोहागपूर गढी येथील दिवंगत कुंवर मृगेंद्र सिंह यांची मुलगी मधुलिका हिचे रावत यांच्याशी लग्न झाले. त्यांचे कुटुंबीय सध्या शहडोल जिल्हा मुख्यालयातील राजाबाग या वडिलोपार्जित निवासस्थानी राहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या दुर्घटनेनंतर मधुलिका यांचा भाऊ यशवर्धन सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मला फोनवर हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळाली. मी भोपाळमध्ये आहे आणि दुःखद बातमीची खातरजमा केल्यानंतर मी दिल्लीला जात आहे. लष्कराने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. माझी आई वृद्ध असून शहडोलमध्ये आहे. रात्री उशिरा ती जबलपूरहून लष्करी अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला रवाना होणार आहे. त्यांना घेण्यासाठी अधिकारी शहडोल येथे पोहोचले आहेत. अद्याप त्यांना या दुःखद घटनेची माहिती नाही आणि आमचे जवळचे नातेवाईक लवकरच आमच्या वडिलोपार्जित घरी पोहोचतील आणि त्यांना हेलिकॉप्टर अपघाताबद्दल सांगतील. असे ते म्हणाले. सिंह म्हणाले की, रावत सैन्यात कॅप्टन असताना माझ्या बहिणीने त्यांच्याशी लग्न केले होते. जनरल रावत शेवटचे २०१२ मध्ये शहडोल येथे सासरच्या घरी गेले होते. माझी मुलगी बंदवी दक्षिण अमेरिकेतील पेरूहून जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊन परतली असताना अलीकडेच दिल्लीतील दसरा सणाच्या वेळी मी त्यांना शेवटची भेट घेतली. मी जानेवारी २०२२ मध्ये शहडोलला भेट देईल. तेथे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असल्याने जिल्ह्यात एक सैनिक शाळा बांधेन असे आश्वासनही रावत यांनी दिल्याचे सिंह म्हणाले. यासंदर्भात स्थानिक खासदार आणि मंत्र्यांशी चर्चा करण्यास रावत यांनी सांगितले होते. रावत दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुंबईत राहते तर दुसरी त्यांच्यासोबत राहत होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rOggZv
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Bipin Rawat यांचे 'हे' स्वप्न अपूर्ण, नातेवाईकांनी केला खुलासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel