Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-17T08:00:32Z
Rojgar

आरोग्य भरती, म्हाडा पेपरफुटी: परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

Advertisement
म. टा. प्रतिनिधि, पुणे पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.आरोग्य, म्हाडा पेपर फुटीनंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा () चे पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करीत असताना सायबर पोलिसांना म्हाडाच्या पेपरबाबतची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डा. प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. देशमुख याच्या घरझडतीत टीईटीच्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचा संशय वाढला होता. त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ‘म्हाडा’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना गुरुवारी पेन ड्राइव्हसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती. त्या पेन ड्राइव्हमधील डेटामधून पोलिसांना आणखी काही माहिती मिळाली. त्या दृष्टीने तपास सुरू होता. देशमुख याच्या घरी आढळलेल्या कागदपत्रांमध्ये टीईटी परीक्षेसंदर्भातीलही काही कागदपत्रे सापडली.


source https://maharashtratimes.com/career/career-news/msce-pune-commissioner-tukaram-supe-arrested-by-pune-cyber-police-regarding-tet-and-health-recruitment-exam-paperleak/articleshow/88333567.cms