Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T14:00:58Z
Rojgar

टीईटी परीक्षेतही पेपरफुटी? म्हाडा गैरप्रकारातील तपासात सापडले महत्त्वाचे धागेदोरे

Advertisement
‘म्हाडा’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना पेन ड्राइव्हसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. त्या पेन ड्राइव्हमधील डेटामधून पोलिसांना आणखी काही माहिती मिळाली आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुख याच्या घरी आढळलेल्या कागदपत्रांमध्ये टीईटी परीक्षेसंदर्भातीलही काही कागदपत्रे सापडली असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. जी ए टेक्नॉलॉजी कंपनीने २१ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. ‘म्हाडा’च्या पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या डॉ. देशमुखसह आणखी दोघेजण पोलिस कोठडीत आहेत. तपासादरम्यान सायबर सेल पोलिसांनी देशमुख याच्या पिंपरी-चिंचवड परिसरातील घराची झडती घेतली. त्या वेळी पोलिसांना पेन ड्राइव्ह मिळाला. तसेच, आणखी काही कागदपत्रेही हाती लागली आहेत. त्या पेन ड्राइव्हमधील डेटा तपासून पाहण्यात येत आहे. त्यातून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. देशमुख याच्या संपर्कात असलेल्या एजंटांची माहिती काढून त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच त्याने घेतलेल्या इतर परीक्षांमध्ये काही गैरव्यवहार केला आहे, का याबाबतही पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांची पथके वेगवेगळ्या शहरात तपास करत आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-paperleak-2021-important-information-in-mhada-paperleak-chances-of-paper-leak-in-tet-exam-too/articleshow/88318817.cms