Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-12-15T08:00:16Z
Rojgar

पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा १६ डिसेंबरपासून; एका बाकावर एकच विद्यार्थ्याची अट

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे अखेर शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा उद्या, गुरुवारपासून (१६ डिसेंबर) सुरू होणार आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर पहिल्यांदाच या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, शाळांमध्ये तयारीला वेग आला आहे. करोना प्रतिबंधासाठीचे सर्व उपाय योजूनच हे वर्ग सुरू करता येतील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यास परवानगी असून, दोन बाकांमधील सहा फूट असावे, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश काढले. या आदेशानुसार पहिली ते सातवीचे वर्ग १६ डिसेंबरपासून सुरू करता येतील. या संदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी काढलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येतील. शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे; तसेच थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदींची उपलब्धता करणेही आवश्यक आहे. खडकी आणि पुणे कँन्टोन्मेंट बोर्डालाही हे आदेश लागू असतील. शाळेसाठीचे नियम - एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यास परवानगी असून, दोन बाकांमधील सहा फूट असावे. - शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. - लसीकरण पूर्ण नसलेल्यांना ४८ तासांपूर्वीची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक. त्याचा अहवाल शाळेत ठेवणे बंधनकारक. - वर्ग खोल्या; तसेच स्टाफ रूममध्ये सुरक्षित वावराचे निकष पाळणे बंधनकारक - दर्शनी भागात करोना प्रतिबंधक नियमांचे पोस्टर, स्टिकर लावावेत. - सुरक्षित वावरासाठी विशिष्ट चिन्हांकन करावे. - शाळेत येण्यासाठी पालकांचे लेखी संमतीपत्र बंधनकारक करोना प्रतिबंधक नियमावली व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच १६ डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होतील. पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत चर्चा करून आम्ही एकमताने हा निर्णय घेतला आहे. - मुरलीधर मोहोळ, महापौर ६०४ शाळांचे भरणार वर्ग शहरातील महापालिकेच्या २२८ शाळा गुरुवारपासून सुरू होतील. खासगी व इतर शाळा मिळून ६०४ शाळा सुरू होतील. यामध्ये दोन लाख १७ हजार ४४९ विद्यार्थी असून, सहा हजार ५७६ शिक्षक आहेत. मुंबईत आजपासून शाळा सुरू मुंबई : शहरात मार्च २०२०मध्ये करोनामुळे बंद झालेल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा आज, बुधवारपासून (१५ डिसेंबर) प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत. मुंबई शिक्षण विभागातर्फे सर्व शालेय मुख्याध्यापकांना पत्राद्वारे या संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे शाळा सुरू कराव्यात, असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-school-reopening-schools-reopening-in-pune-from-16th-december-2021-for-class-1st-to-7th/articleshow/88291237.cms