Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-22T09:00:14Z
Rojgar

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बोर्ड परीक्षेसाठी अधिक वेळ मिळणार

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी | मुंबई दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. यामुळे लिखाणाचा सराव सुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा साडेतीन तासांची असेल. दहावी व बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ७० आणि त्याहून अधिक गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे आणि ७०हून कमी गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन शिक्षणामुळे गतवर्षीही हा बदल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी ऑफलाइन परीक्षाच झाली नाही. ७०, ८० आणि १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास, तर ४०, ५० आणि ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी २९ लाख ५४ हजार ७४१हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये दहावीचे १५ जाख २७ हजार ७६१ तर बारावीचे १४ लाख २६ हजार ९८० विद्यार्थी आहेत. यंदा बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक https://ift.tt/3JakocI या वेबसाइटवर पाहता येणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन तारखेनुसार वेळापत्रक पाहता येणार आहे. वेबसाइटवर देण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या आधी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक हे अंतिम स्वरुपाचे असणार आहे. छापील वेळापत्रकावरुन विद्यार्थ्यांनी तारखांची खात्री करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंच होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-time-students-will-ssc-and-hsc-students-get-more-time-in-maharashtra-board-exam/articleshow/88425685.cms