Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T10:00:12Z
Rojgar

शिवाजी विद्यापीठामध्ये भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

Advertisement
2021: शिवाजी विद्यापीठामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator) कम कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) आणि रोजंदारी कनिष्ठ लेखनिक (Daily wages Junior Writer) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रशासकीय कामांसाठी विशिष्ट कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर कम ज्युनिअर असिस्टंटची २ पदे भरली जाणार आहेत. या पदाचा कालावधी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत असणार आहे. या पदासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येईल. रोजंदारी कनिष्ठ लेखनिक पदाची १ जागा भरली जाणार आहे. शैक्षणिक अर्हता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्याच्याकडे इंग्रजी टायपिंगचा ४० शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंगचा ३० शब्द प्रति मिनिट इतका वेग असावा. वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय १८ वर्षे आणि किमान वय ३८ वर्षे इतके असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे. पगार कॉम्प्युटर ऑपरेटर कम ज्युनिअर असिस्टंट पदासाठी ९ हजार पाचशे रुपये पगार दिला जाईल. तर रोजंदारी ज्युनिअर टायपिस्ट पदासाठी ४०० रुपये प्रतिदिन इतका पगार दिला जाईल. उमेदवारांची मुलाखत मुख्य इमारत , कोल्हापूर या पत्त्यावर २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता घेतली जाणार आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/shivaji-university-recruitment-various-post-vacant-in-shivaji-university-selection-will-be-through-direct-interview/articleshow/88316042.cms