TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

टीकाकार उमेदवारांविरुद्ध 'एमपीएससी'ची आचारसंहिता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य लोकसेवा आयोगाच्या () परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. याचबरोबर यामध्ये वेगवेगळी विघ्नेही येत आहेत. यामुळे नाराज विद्यार्थी समाजमाध्यमांवरून तसेच प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होत असतात; मात्र आयोगाविरोधातील अशा टीका-टिप्पणी रोखण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. आयोगाने अशा टीकेवर आक्षेप घेतल्यास उमेदवार काही वर्षे या परीक्षेस अपात्रही ठरू शकतात. याबाबत आयोगाने गुरुवारी परिपत्रक काढले आहे. उमेदवारांनी लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात; तसेच आयोगाच्या विरोधात असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीकाटिप्पणी आणि संभाषण केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या परिपत्रकानुसार एखाद्या उमेदवाराला आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून कायमस्वरूपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी अपात्र करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. आयोगाने हे परिपत्रक काढून उमेदवारांना याविषयी थेट इशारा दिला आहे; तसेच संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान सहसचिवांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. सभ्यतेचे भान आवश्यक आयोगावर टीका करीत असताना सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषाशैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे; परंतु काही उमेदवार, व्यक्ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवर मत, अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरून संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर केला जातो. ही बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली असल्याने याविषयी गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-can-disqualify-candidates-criticizing-the-commission-on-social-media/articleshow/88605712.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या