Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २० डिसेंबर, २०२१, डिसेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-20T08:00:44Z
Rojgar

विद्यार्थ्यांमधील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष टास्क फोर्स

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद विद्यापीठ, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात घेत, विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग टास्क फोर्स तयार करणार आहे. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणावर भर दिला जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे किती झाले याचा आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. करोनाच्या नव्या ओमायक्रॉन या प्रकारामुळे उद्रेकाची भीती व्यक्त केली जात आहे. अशा वेळी लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना औरंगाबाद जिल्ह्यात महाविद्यालयीने विद्यार्थ्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे सांगण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे आपल्या संलग्नित महाविद्यालयातील लसीकरणाचे अद्ययावत आकडेवारीही उपलब्ध नाही. सहसंचालक कार्यालयाकडेही आकडेवारी महिनाभरापूर्वीची आकडेवारी आहे. विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाविद्यालयांची उदासनिता जिल्ह्याच्या टास्क फोर्समध्ये चर्चेचा विषय ठरला. प्रशासनाने सक्त ताकीद देऊन लसीकरणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहसंचालक कार्यालय स्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. टास्क फोर्स महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला भेट, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, प्रत्यक्ष लसीकरण याची माहिती घेईल, प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कळते. आकडेवारींचा गोंधळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे आहेत. विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांची संख्या ४६३ आहे. या महाविद्यालयांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर अशा १४६ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यानंतरही उच्च शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीत केवळ ८६५५ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. प्रत्यक्ष तासिकेला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्याने दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. लसीकरण अनेक विद्यार्थ्यांचे झालेले नसल्याने उपस्थितीवरही परिणाम झाला असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत निश्चित माहिती कॉलेजांकडून उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, लसीकरणाचा टक्का कमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यावर आमचा भर असेल असे औरंगाबाद उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/special-task-force-for-students-decision-of-the-department-of-education-to-increase-the-rate-of-immunization/articleshow/88384429.cms