
Indian Army Artillery Recruitment 2022: भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सैन्याने आर्टिलरी भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज कर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे. या भरतीच्या माध्यमातून (Sena Bharti 2022) लोअर डिवीजन क्लर्क (LDC), मॉडल वर्कर, कारपेंटर, स्वयंपाकी, रेंज लस्कर, फायरमन आदि विविध पदांवर १०७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मागील भरती जाहिरातीच्या आधारे ज्यांनी अर्ज भरला आहे, त्या सर्वांना लेटेस्ट नोटिफिकेशनच्या आधारे नव्याने अर्ज दाखल करायचा आहे. भारतीय सेना आर्टिलरी भरती २०२२ नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्तात पुढे दिली आहे. Indian Army Artillery Vacancy 2022 Details: पदांची माहिती पुढीलप्रमाणे - लोअर डिवीजन क्लर्क (LDC) - २७ पदे मॉडल मेकर - १ पद कारपेंटर - २ पदे स्वयंपाकी - २ पदे रेंज लस्कर - ८ पदे फायरमन - १ पद अर्टी लस्कर -७ पदे न्हावी - २ पदे धोबी - ३ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - ४६ पदे साइस - १ पद एमटीएस लस्कर - ६ पदे इक्विपमेंट रिपेयरर - १ पद एकूण रिक्त पदे - १०७ पदे अर्जासाठी पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक. वयोमर्यादा उमेदवारांची किमान वर्य १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल. पगार किती? (Pay Scale) एलडीसी, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमन आणि स्वयंपाकी या लेवल २ पदांसाठी १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतन दरमहा दिले जाईल. रेंज लस्कर, अर्टी लस्कर, नाव्ही, एमटीएस, साइस, धोबी, एमटीएस लष्कर आणि इक्विपमेंट रिपेयरर - पे लेवल -१, पे मेट्रिक्स १८ हजार ते ५६,९०० रुपये. भारतीय सेना आर्टिलरी भरती २०२२ चे नोटिफिकेशन
source https://maharashtratimes.com/career/career-news/indian-army-artillery-recruitment-2022-vacancy-for-107-posts-defence-civilian-posts/articleshow/88590054.cms
0 टिप्पण्या