पालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

पालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या ११ शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मान्यता दिली आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे. पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळ, , आयसीएसई, केंब्रिज आणि आयबी मंडळाचे शिक्षण मोफत मिळावे या उद्देशाने प्रत्येक वॉर्डामध्ये एक शाळा सीबीएसईची करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. यानुसार या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकच झुंबड उडाली होती. यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल चिकूवाडी, जनकल्याणनगर. प्रतीक्षानगर, पूनम नगर, मिठागर, हरियाली व्हिलेज, राजावाडी, अझिझ बाग, तुंगा व्हिलेज, भवानीशंकर, काणेनगर या शाळांचा समावेश आहे. या शाळांना बुधवारी सीबीएसईने मान्यता दिल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटकरून कळविले. या माध्यमातून पालिका दर्जात्मक शिक्षण मराठी भाषेचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न कणार असल्याचेही ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/11-bmc-schools-get-cbse-recognition/articleshow/88313657.cms

0 Response to "पालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel