Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-12-15T13:01:02Z
Rojgar

करोनानंतर शिक्षणाचा खर्च वाढला, शहरात परतलेले विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री

Advertisement
म.टा. प्रतिनिधी | नागपूर करोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षानंतर महाविद्यालयांची कवाडे विद्यार्थ्यांना खुली झाली आहेत. प्रत्यक्ष वर्ग गजबजू लागले आहेत. इतर शहरांतून शिकावयास येणारे विद्यार्थी परतले आहेत. या विद्यार्थ्यांना करोनानंतर शिक्षण महागल्याचा अनुभव येत आहे. शैक्षणिक साहित्यासह राहणे, खाणे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडत आहे. शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, माफसू, व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस, आयआयएम, ट्रिपल आयटी, एमएनएलयू आदी मोठ्या शैक्षणिक संस्थांसह खासगी महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बरेच जण नागपूर जिल्हा आणि विदर्भासह इतर भागातील आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अगदी सकाळच्या चहा-नाश्त्यापासून सुरू होणारा खर्च रात्रीपर्यंत कायम असतो. अशात शैक्षणिक दृष्टीने होणाऱ्या खर्चात झालेली वाढ विद्यार्थ्यांची चिंता वाढविणारी आहे. राहणे, खाणे आणि शैक्षणिक साहित्याच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल अधिक सांगताना बीएससीला असलेला नयन निखाडे म्हणाला, ‘करोनानंतर शहरात राहणे अवघड झाले आहे. पूर्वी चार हजारांत महिन्याचा खर्च भागायचा. आता सात ते आठ हजार रुपये खर्च होत आहे. त्या तुलनेत सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ झालेली नाही. याशिवाय रूम भाड्याबरोबर आता वीजबिल स्वतंत्र भरण्यास सांगितले जात आहे. परिणामत: खर्चाचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.’ तर बीएससी अॅग्रीला असलेला अंशुल यादव म्हणाला, ‘दीड वर्षानंतर मी शहरात येत नाही तोच वाढलेल्या दराने डोळे वटारले असल्याने शैक्षणिक खर्च कसा भागवावा, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला आहे. पालकांनी पाठवलेले पैसे महिनाभर पुरत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.’ असे वाढलेत दर (प्रतिमहिना) घटक : करोनापूर्वी : आता मेस : १८०० ते २०००-२६०० ते ३००० रुमभाडे : १५०० ते २०००-२५०० ते ३५०० चहा-नाश्ता : ३००-४५० मोबाइल रिचार्ज : २००-३०० शैक्षणिक साहित्य : ७०० ते ८००-१००० ते १२०० वाचनालय : ४००-६०० दूध : ५५-६०


source https://maharashtratimes.com/career/career-news/corona-effect-on-education-expensive-education-after-corona-students-returning-from-village-worried/articleshow/88295221.cms