Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T09:00:59Z
Rojgar

BSNL मध्ये नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार भरती

Advertisement
BSNL : भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited, BSNL) महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती (BSNL ) होणार असून डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice)ची पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे AICTE ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजी (Engineering/Technology) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ई अॅण्ड टीएस, कॉम्प्युटर, आयटी (Electronics/E&TC/Computer/IT) यापैकी एका ब्रांचेसमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ नुसार स्टायपेंड दिला जाईल. तसेच सरकारी नियमानुसार SC/ST/PWD/OBC/EWS इत्यादी उमेदवारांना सवलत देण्यात येणार आहे. डिप्लोमामध्ये मिळवलेली अंतिम टक्केवारी आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/government-job-various-post-vacant-of-diploma-apprentice-in-bsnl/articleshow/88312948.cms