
कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमार्फत ही परीक्षा घेण्यात आली आहे. ३ जानेवारीपर्यंत कॅट परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाइल गुण आणि गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर उपलब्ध होईल. निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाणार त्याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मागील वर्षांचे ट्रेंड्स पाहता निकाल दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने कॅट २०२१ स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल. आयआयएम त्यांचे प्रवेशाचे निकष जाहीर करतील. विद्यार्थी त्यांचे कॅट पर्सेंटाइल तपासून पुढे प्रवेशाची प्रक्रिया पार पाडू शकतात. CAT 2021 परीक्षा यंदा दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात आली आहे. प्रोव्हिजनल उत्तरतालिका ८ डिसेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारांना हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या हरकती तपासल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/cat-2021-result-date-result-expected-by-january-3-on-iimcat-ac-in/articleshow/88610072.cms
0 टिप्पण्या