TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CAT 2021: कॅट परीक्षेला १.९२ लाख उमेदवार; आन्सर की लवकरच Rojgar News

व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी सीईटी अर्थात कॉमन अॅडमिशन टेस्ट () २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत सुमारे १.९२ लाख उमेदवार उपस्थित राहिले होते. एकूण उपस्थिति ८३ टक्के होती. एकूण २.३० लाख उमेदवारांनी या मॅनेजमेंट एन्ट्रन्स टेस्टसाठी अर्ज केले होते. नोटिसमध्ये म्हटले होते की, 'परीक्षा देणाऱ्या १.९२ लाख उमेदवारांमध्ये ३५ टक्के महिला, ६५ टक्के पुरुष आणि २ टक्के ट्रान्सजेंडर उमेदवार होते.' कॅट एन्ट्रन्स परीक्षा १२० मिनिटांची होती. प्रत्येक सेक्शनसाठी ४० मिनिटांचा अवधी होता. तज्ज्ञांच्या मतानुसार, कॅटचा पेपर मागील वर्षीच्या तुलनेत सोपा होता. लवकरच जारी होणार आन्सर की कॅट २०२१ परीक्षेची आन्सर की लवकरच जारी होऊ शकते. कॅट परीक्षेची आन्सर-की अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जारी केली जाईल. उमेदवार केवळ या वेबसाइटच्याच माध्यमातूनच आन्सर-की डाऊनलोड करता येईल. कॅट २०२१ चा निकाल जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. CAT 2021 Answer Key या स्टेप्स द्वारे करा डाऊनलोड स्टेप १: उमेदवार ऑफिशियल वेबसाइट iimcat.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइट वर दिलेल्या आन्सर-की च्या लिंक वर क्लिक करा. स्टेप ३: आता आन्सर-की स्क्रीन वर येईल. स्टेप ४: आन्सर की चेक करा. स्टेप ५: आता आन्सर की डाऊनलोड करा. पूर्वी CAT चे निकाल साधारणपणे ५ जानेवारी किंवा पहिल्या आठवड्यात जाहीर होत असत. निकाल घोषित झाल्यानंतर लगेचच काऊन्सेलिंग शेड्युलही जारी केलं जायचं. उमेदवार आपल्या कॅट २०२१ स्कोरच्या माध्यमातून विविध आयआयएम आणि अन्य टॉप मॅनेजमेंट संस्थांमधील कॉलेजांसाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. उमेदवारांना सल्ला दिला जातो की कॅट २०२१ च्या तारखांसंबंधी अधिक अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3diAORA
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या