TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CAT Answer Key 2021: कॅटची प्रोव्हिजनल आन्सर की जारी Rojgar News

2021: देशातील टॉप मॅनेजमेंट संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी कॉमन एडमिशन टेस्ट २०२१ अर्थात कॅट परीक्षा २०२१ ची () प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर झाली आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयआयएम अहमदाबादने ही उत्तरतालिका संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. आयआयएम अहमदाबादची अधिकृत वेबसाइट वर ही उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. या परीक्षेचे (CAT Exam 2021) आयोजन २८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. या प्रोव्हिजनल आन्सर- कीवर(CAT 2021 Answer Key) उमेदवार ११ डिसेंबर २०२१ पर्यंत हरकत नोंदवू शकतात. या हरकतींची तड लावल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. त्यानंतर जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॅटचा निकाल लागणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी ४ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. ती २२ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू होती. CAT Answer Key 2021: पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट आन्सर की - १. सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जावे. २. होम पेज वर दिलेल्या Registered Candidate Login च्या लिंक वर क्लिक करा. ३. आता आपला यूजर आयडी आणि पासवर्ड आदी माहिती भरा. ४. आन्सर की आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ५. आन्सर की तपासून घ्या आणि डाऊनलोड करा. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rPzvlo
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या