CBSE Exam: टर्म १ बोर्ड परीक्षेत प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीने छापल्या Rojgar News

CBSE Exam: टर्म १ बोर्ड परीक्षेत प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीने छापल्या Rojgar News

Exam Question papers : बोर्ड टर्म १ च्या परीक्षेत चुकीच्या पद्धतीने प्रश्नपत्रिका छापण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडत आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रश्नपत्रिका छापल्या जात नाहीत. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) स्वत: आपली अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर नोटीस जाहीर करून परीक्षा केंद्रांना इशारा दिला आहे. यामध्ये शाळांचे मुख्याध्यापक आणि परीक्षा केंद्र अधीक्षकांना संबंधित चूक तातडीने थांबवून बोर्डाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील प्रश्नपत्रिका आधीच छापल्या जात आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. हे सीबीएसईने घालून दिलेल्या नियमांच्या विरोधात आहे असे सीबीएसईने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांनी प्रथम फक्त इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका छापल्या पाहिजेत आणि परीक्षेच्या वेळी त्या विद्यार्थ्यांना द्याव्यात. कोणत्याही प्रश्नपत्रिकेची हिंदी आवृत्ती विद्यार्थ्याला आवश्यक असेल तेव्हाच छापली जाते. हीच प्रक्रिया हिंदी माध्यमासाठीही अवलंबावी लागेल. जेथे विद्यार्थ्यांचे शिक्षण माध्यम हिंदी असेल तेथे प्रथम प्रश्नपत्रिका हिंदीतच छापाव्यात. एखाद्या विद्यार्थ्याने त्याची इंग्रजी आवृत्ती मागितली तर इंग्रजीचा पेपर छापून द्या असे 'सीबीएसईच्या गाईडलाइन्समध्ये म्हटले आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेत, बोर्डातर्फे जवळजवळ सर्व विषयांसाठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिल्या जातात. दोन्ही भाषांमधील प्रश्न एकाच पेपरमध्ये दिले जात नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेचे माध्यम म्हणून हिंदी निवडले असेल, तर त्याला पहिली प्रश्नपत्रिका हिंदी भाषेतूनच दिली जाते. परीक्षेदरम्यान गरज भासल्यास विद्यार्थ्याला पर्यवेक्षकाकडून इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेची मागणी करावी लागते. त्यानंतर त्याच वेळी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका प्रिंट करुन त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल. त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा नियम असेल असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. पण परीक्षा केंद्रांकडून हा नियम पाळला जात नसल्याने सीबीएसईने केंद्रांना ताकीद दिली आहे. हा नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DfZpkt
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "CBSE Exam: टर्म १ बोर्ड परीक्षेत प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीने छापल्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel