Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-12-08T08:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE परीक्षेसंदर्भात बोर्डाकडून महत्वाचे बदल, OMR शीटवरील चुकीला पर्यवेक्षक जबाबदार Rojgar News

Advertisement
2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी-बारावी टर्म १ परीक्षेच्या (10th-12th term-1 exam) ओएमआर शीटमध्ये () महत्वाचे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बोर्डाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ओएमएमआर शीटवरील चुकीसाठी परीक्षाकेंद्रावरील कक्ष निरीक्षक आणि पर्यवेक्षक जबाबदार असतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओएमआर शीटमध्ये विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी कक्ष निरीक्षक आणि पर्यवेक्षकांना घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटवरील प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर बोल्ड करणे आवश्यक आहे. त्यानंतर एकाच रकान्यामध्ये योग्य प्रश्नाचे उत्तर भरावे लागेल असे सीबीएसईच्या जिल्हा समन्वयक डॉ. सीमा बिस्वास यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी डार्क केलेल्या राऊंडचे लेटर स्मॉल लेटरमध्ये लिहीत होते. ज्यामुळे उत्तरपत्रिका तपासताना अडचण येत होती. याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ओएमआर शीटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. म्हणजेच आता डार्क बॉक्सनंतर दिलेल्या बॉक्सवर फक्त कॅपिटल लेटरमध्ये लिहावे लागेल. यामध्ये कोणतीही चूक करू नका असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे. कॅपिटल लेटरमध्ये लिहा उत्तर उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना परीक्षकांना स्मॉल आणि कॅपिटल अक्षरांमधील फरक समजू शकत नाही. त्यामुळे यापुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले उत्तर कॅपिटल अक्षरात लिहिण्याची सूचना सीबीएसईने केली आहे. सीबीएसई बोर्डाने जिल्हा समन्वयकांना हे पाहण्याची सूचना केली आहे. विद्यार्थी त्यांचे उत्तर स्मॉल लेटरमध्ये भरत नसतील तर कक्ष निरीक्षकांना ते दुरुस्त करून घ्यावे लागेल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटमध्ये कोणतीही चूक होणार नाही हे पाहण्याची जबाबदारीही पर्यवेक्षकांची असणार आहे. सीबीएसई टर्म १ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षेनंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या संभाव्य गुणांचा अंदाज लावता यावा म्हणून बोर्ड उत्तरतालिका प्रसिद्ध करत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून गुण बोर्डाच्या वेबसाइटवर अपलोड केले जात आहेत. गैरप्रकार करणाऱ्यांवर नजर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यापासून रोखण्यासाठी बाहेरील पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांमध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. CBSE टर्म १ च्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. गैरप्रकार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या परीक्षाकेंद्रांमध्ये अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्टच्या मदतीने सुधारणा केली जाणार असल्याचे जोहरी यांनी सांगितले. केंद्र आणि व्यक्तीगत परीक्षार्थी स्तरावर संशयास्पद डेटा पॅटर्न ओळखण्यासाठी सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन (CSF) आणि प्लेपॉवर लॅब यांच्या सहकार्याने जानेवारी २०२१ मध्ये (CTET) परीक्षेच्या डेटावर प्रायोगिक विश्लेषण करण्यात आल्याचे जोहरी म्हणाले. आता अशा प्रकारचे विश्लेषण सीबीएसईच्या सर्व परीक्षांमध्ये केले जाणार आहे. तसेच, याचा उपयोग नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आणि बोर्ड परीक्षांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pFbKcW
Source https://ift.tt/310mqee