TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CTET 2021: परीक्षेचा पेपर पॅटर्न जाणून घ्या... Rojgar News

2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२१ म्हणजेच CTET परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र (CTET Exam Admit Card 2021) लवकरच जारी केले जाईल. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा असेल, ते पाहू. CBSE ने जारी केलेल्या CTET माहिती पुस्तिकेनुसार, CTET प्रवेशपत्र डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. CTET परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र CTET वेबसाइट ctet.nic.in वर जारी केले जाईल. परीक्षेपूर्वी परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न जाणून घ्या. CTET परीक्षा पॅटर्न CTET चे पूर्ण नाव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test) आहे. इयत्ता पहिली ते पाचवीचे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना CTET पेपर- १ द्यावा लागेल. ज्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक व्हायचे आहे, त्यांना पेपर-२ देणे बंधनकारक आहे. CTET पेपर- १ CTET च्या पेपर-१ मध्ये हिंदी, चाइल्ड डेवलपमेंट अँड पेडगॉजी, इंग्रजी, पर्यावरण आणि गणित या विषयांचे प्रश्न असतात. प्रत्येक विषयाचे ३० प्रश्न असतील. यातील पेपर्स मल्टीपल चॉइस म्हणजेच बहुपर्यायी (MCQ)स्वरुपाचे असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण दिला जाईल, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाणार नाही, म्हणून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. CTET पेपर- २ सीटीईटी पेपर-२ मध्ये भाषा-१, भाषा-२, चाइल्ड डेवलपमेंट अँड पेडागॉजी, इंग्रजी, पर्यावरण आणि गणित किंवा सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न विचारले जातील. सीटीईटीच्या दोन्ही पेपरमध्ये १५० गुणांसाठी १५० प्रश्न विचारले जातील, हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना एकूण १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे दिली जातील. निगेटिव्ह मार्किंग नाहीत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचा तपशील नियोजित तारखांना दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. CBSE CTET माहिती पुस्तिकेनुसार नुसार, चा निकाल १५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर होईल. हेल्पलाइन क्रमांक CTET 2021 संबंधी कोणत्याही प्रश्नासाठी, उमेदवार CBSE CTET हेल्पलाइन क्रमांक ०११-२२२४०१०७ किंवा ०११-२२२४०१२ वर संपर्क साधू शकता. याशिवाय, ctet.cbse@nic.in वर ईमेल देखील पाठवता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G94e0G
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या