CTET 2021 परीक्षेसंदर्भात सीबीएसईची मोठी घोषणा Rojgar News

CTET 2021 परीक्षेसंदर्भात सीबीएसईची मोठी घोषणा Rojgar News

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test, ) फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. सीबीएसई बोर्डाने (Central Board of Secondary Education, ) पुढील आठवड्यात १६ डिसेंबरपासून परीक्षा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे. यानुसार, बोर्डाने लाखो परीक्षार्थींसाठी प्रॅक्टिस सेंटरची यादी जाहीर केली आहे. बोर्डाने एकूण ३५६ प्रॅक्टिस सेंटरची यादी जारी केली आहे. या अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रांवर जाऊन उमेदवार ऑनलाइन आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करू शकतात. सराव करू शकतात. यासोबतच बोर्डाने अधिकृत पोर्टल ctet.nic.in वर मॉक टेस्टची लिंकदेखील अॅक्टिव्ह केली आहे. ही परीक्षा संगणकीकृत पद्धतीने (CBT)होणार आहे. या परीक्षेची मॉक टेस्ट लिंक कॅंडिडेट कॉर्नरमध्ये अपलोड केली आहे. या माध्यामातून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतात. CTET 2021 परीक्षा पहिल्यांदा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. सीबीएसईने उमेदवारांना नवा परीक्षा पॅटर्न समजून देण्यासाठी सीटीईटी डिसेंबर २०२१ मॉक टेस्ट आणि अभ्यास केंद्रांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. सीटीईटी परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ त्या उमेदवारांसाठी असेल, ज्यांना पहिली ते पाचवीचे शिक्षक बनायचे आहे. या पेपरमध्ये पाच विभागातील प्रश्न असतील. यात भाषा १, भाषा २, बाल विकास आणि शिक्षणशास्त्र, पर्यावरण अध्ययन आणि गणित या विषयांचा समावेश आहे. जे उमेदवार सहावी ते आठवीचे शिक्षक बनू इच्छितात, त्यांना पेपर २ द्यायचा आहे. सीबीएसईने अलीकडेच घोषणा केली होती की सीटीईटी स्कोअर आता आयुष्यभरासाठी मान्य असेल. यामुळे सीटीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31QeJaA
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "CTET 2021 परीक्षेसंदर्भात सीबीएसईची मोठी घोषणा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel