Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T09:00:57Z
Rojgar

CTET २०२१ परीक्षेला सुरुवात, 'हे' ४ निर्देश लक्षात ठेवा अन्यथा परीक्षा देता येणार नाही

Advertisement
2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा १६ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) CTET २०२१ साठी आवश्यक मार्गदर्शक निर्देश जाहीर केल आहेत. सीबीएसई सीटीईटी परीक्षा २०२१ (CBSE 2021) मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी ४ महत्त्वाच्या सूचनांची नक्कीच काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला परीक्षेत बसू दिले जाणार नाही. किंवा परीक्षा दिल्यानंतर तुमच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन रद्द केले जाऊ शकते. सीबीएसई बोर्डाने सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर परीक्षेशी संबंधित महत्वाचे निर्दश जाहीर केले आहेत. तुम्हाला या चार गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधी परीक्षा केंद्राचा गेट उघडले जातील. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर आधीच पोहोचावे लागेल. परीक्षा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. सीबीएसईने जाहीर केलेल्या CTET २०२१ ची प्रिंट तपासल्यानंतरच परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. सीटीईटी प्रवेशपत्राव्यतिरिक्त, वैध फोटो आयडी पुराव्याची मूळ प्रत सोबत ठेवा. ते अनिवार्य आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने उमेदवारांसाठी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म (CTET self declaration form)अनिवार्य केला आहे. उमेदवारांना हा डिक्लेरेशन फॉर्म भरुन परीक्षेपूर्वी केंद्रात जमा करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या गेल्या काही दिवसांतील प्रवासाचा तपशील आणि आरोग्याची माहिती विचारली जाईल. परीक्षेचा पेपर लिहिताना कोणत्याही प्रकारचे रफ काम करण्यासाठी पर्यवेक्षकाकडून रफ शीट मागवा. परीक्षा संपल्यानंतर, तुम्हाला ही रफ शीट परत पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागेल. तुम्ही रफ शीट घेऊन परीक्षा केंद्राबाहेर जाऊ शकत नाही. या वस्तू आणण्यास बंदी CTET परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षा हॉलमध्ये पेन्सिल बॉक्स, कॅल्क्युलेटर, रायटिंग पॅड, ब्लूटूथ, इअरफोन, घड्याळ, हँडबॅग, मोबाईल फोन अशी कोणतीही वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. चुकून अशी कोणतीही वस्तू घेऊन गेल्यास, परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रावर जमा करा. सीबीएसईतर्फ १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत सीटीईटी परीक्षेचे आयोजन केले जात आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये असेल. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २.३० ते ५ या वेळेत होईल. सध्या १६ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या CTET परीक्षेसाठी बोर्डाकडून CTET प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. जानेवारीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र काही दिवसांनी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केले जाणार आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ctet-2021-ctet-exam-from-today-cbse-has-issued-necessary-instructions/articleshow/88311600.cms