TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Cyclone Jawad: 'या' भागातील यूजीसी नेट, आयआयएफटी परीक्षांना मुदतवाढ Rojgar News

Jawad: जवाद चक्रीवादळामुळे () ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही भाग प्रभावित झाला आहे. म्हणून या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवरील विद्यापीठ अनुदान आयोग - राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT) च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटीस द्वारे ही माहिती दिली आहे. नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार यूजीसी नेट २०२० (UGC-NET 2020) आणि जून २०२१ परीक्षा पुरी, भुवनेश्वर, कटक, विशाखापट्टणममधील बेरहामपूर आणि आंध्र प्रदेशातील गंजम जिल्हे आणि ओडिशातील रायगड जिल्ह्यातील गुणुपूर या केंद्रांसाठी पुन्हा घेतल्या जाणार आहेत. या भागात आयआयएफटी परीक्षा होणार नाही पश्चिम बंगालमधील आणि कोलकाताच्या दुर्गापूर, ओडिशातील भुवनेश्वर, कटक आणि संबलपूर; आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि विशाखापट्टणम केंद्रांवरील आयआयएफटीके एमबीए (International Business) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा कधी जाहीर होणार? एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या शहरांतील परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. याची अपडेट अधिकृत वेबसाइटवर देण्यात येणार आहे. केवळ नमूद केलेल्या शहरांमधील परीक्षाच पुढे ढकलण्यात आली आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील सर्व शहरांमध्ये परीक्षा वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. हेल्पडेस्कशी संपर्क उमेदवार नवीन अपडेट आणि तपशीलांसाठी एनटीएची अधिकृत वेबसाइट www.nta.ac.in ला भेट देऊ शकतात आणि ००१४०४५९००० वर संपर्क साधू शकतात. हेल्पडेस्क किंवा प्रश्नांसाठी ugc.net@nta.ac.in वर ईमेल करू शकतात. हवामान विभागाचा इशारा बंगालच्या उपसागरावरील खोल दाब शुक्रवारी वाढून जावाद चक्रीवादळात बदलला. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवामान प्रणाली शनिवारी सकाळपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर, वादळ उत्तर-ईशान्येकडे सरकून ओडिशाच्या किनार्‍याजवळून रविवारी दुपारच्या सुमारास पुरीजवळ येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ओडिशाच्या किनारपट्टीसह पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या दिशेने उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची दाट शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IiRbeW
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या