TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Delhi Air Pollution: हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीच्या शाळा पुन्हा बंद Rojgar News

Delhi Schools Closed: दिल्लीतल्या शाळा पुन्हा एकवार बंद करण्यात आल्या आहेत. राजधानीतल्या वाढत्या वायूप्रदूषणामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय (Environment Minister Gopal Rai) यांनी यासंबंधी माहिती देताना म्हटले आहे की दिल्लीत पुन्हा एकदा हवेचा गुणवत्तेचा स्तर खराब झाल्याने दिल्लीतील शाळा शुक्रवार ३ डिसेंबरपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. पर्यावरण मंत्री राय यांनी यासंबंधी एक ट्विट देखील केले आहे. त्यात असं म्हटलं आहे की, 'शहरात सध्याच्या वायू प्रदूषणाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या सर्व शाळा शुक्रवार ३ डिसेंबर पासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहतील.' दिल्ली सरकारने २९ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा उघडण्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात दिल्लीतली हवेची स्थिती खूपच बिघडली होती. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले होते, त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र, दिल्ली आणि अन्य शेजारी राज्यांना राजधानीच्या क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी २४ तासांचे अल्टीमेटम दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही देखील विचारणा केली होती की मोठ्यांना वर्क फ्रॉम होमची व्यवस्था असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सक्ती का केली जात आहे. दिवाळी सणानंतर दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ढासळू लागली होती. यानंतर १३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंऊी अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली होती की विद्यार्थ्यांनी प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागू नये म्हणून शाळा एक आठवड्याकरिता बंद ठेवण्यात येतील. यानंतर देखील शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सुधारला नव्हता, त्यामुळे ही मुदत आणखी एक आठवडा वाढवण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DhvSXJ
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या