
ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत () विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेच्या मुंबई कार्यालयात ही भरती केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग सहाय्यक, लॅब असिस्टंट, लिपिक, महिला अटेंडण्ड, शिपाई आणि सफाईवाला ही पदे भरली जाणार आहेत. मुंबई पॉलिक्लिनिक आणि महाड पॉलिक्लिनिक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मेडीकल आणि पॅरा मेडीकल स्टाफकरीता कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रिंट सेल्फ अटेस्टेड करुन पाठवायच्या आहेत.पदभरतीचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ईसीएचएस,आयएनएस, आंग्रे, एसपीएस रोड, मुंबई, पिनकोड- ४०००२३ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. याच पत्त्यावर उमेदवारांची मुलाखत होणार आहे. वैद्यकीय कर्मचारी वर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी जाहीरात काळजीपुर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज, कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ggnr0K
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या