Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-06T05:43:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC Admission 2021: अकरावी प्रवेशासाठी पुन्हा फेरी? Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही ३२ विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित असून, या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्याबाबत उपसंचालक कार्यालयात विनंती केली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यात आणखी एक प्रवेश फेरी राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी माध्यमिक शिक्षण संचालनालयाशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र; तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी; तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार (एफसीएफएस) दोन फेऱ्या राबविण्यात आल्या. त्यानंतर २२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळावा यासाठी विनंती केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आता पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३२ विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाकडे प्रवेशासाठी विनंती केल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३१७ ज्युनिअर कॉलेजांमधील एक लाख १३ हजार ४८५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रवेशांचे नियोजन ढिसाळ? प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७४ हजार १९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्याप ३९ हजार २९१ जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. एकीकडे वारंवार प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देऊनसुद्धा ३९ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. दुसरीकडे ३२ विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून विनंती केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे योग्य नियोजन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dp3CYA
Source https://ift.tt/310mqee