Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २० डिसेंबर, २०२१, डिसेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-20T16:00:52Z
Rojgar

GATE २०२२ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

Advertisement
2022: साठी नोंदणी केलेल्या आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर संस्थेने इंजिनीअरिंग पदवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांना गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर पाहता येणार आहे. २० डिसेंबर २०२१ रोजी संस्थेने परीक्षा पोर्टलवर हे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी २०२२ महिन्यातील चार तारखांना परीक्षा घेतली जाणार आहे. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यापैकी ४ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी या परीक्षेसंबंधित विविध कामांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पहिल्या सत्रात CE-1, BT, PH आणि EY पेपर होणार आहे. यानंतर दुपारी २.३० ते ५.३० ला दुसऱ्या शिफ्टमध्ये CE-2, XE आणि XL चे पेपर होणार आहेत. वेळापत्रकाच्या शेवटच्या दिवशी १३ फेब्रुवारीला सकाळच्या शिफ्टमध्ये ME-1, PE आणि AR चे पेपर आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ME-2, GE आणि AE होणार आहे. ३ जानेवारीला प्रवेशपत्र आयआयटी खरगपूरने गेट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्राची तारीख जाहीर केली होती. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांना ३ जानेवारी २०२२ पासून परीक्षा पोर्टलवर जाऊन त्यांचे गेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/gate-exam-2022-iit-kharagpur-announces-gate-2022-exam-schedule-will-be-held-on-four-dates-in-february/articleshow/88392828.cms