Gender Equality in School: १०० वर्ष जुन्या मुलींच्या 'या' शाळेत मुलांनाही मिळणार प्रवेश Rojgar News

Gender Equality in School: १०० वर्ष जुन्या मुलींच्या 'या' शाळेत मुलांनाही मिळणार प्रवेश Rojgar News

in Kerala: मुलांना लैंगिक समानतेची शिकवण शाळेपासूनच व्हायला हवी असं आपल्याला वाटतं. पण केरळच्या शाळेनेच आपल्या एका निर्णयाने लैंगिक समानतेचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहे. केरळच्या मुलींच्या शाळेत आता मुलांनाही प्रवेश मिळणार आहे. केरळने लैंगिक समानतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. केरळ सरकारने आता सरकारी मुलींच्या शाळेत मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोझिकोड जिल्ह्यातील माडापल्ली मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेसाठी घेण्यात आला आहे. येथे लवकरच सह-शिक्षण प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या आवडीच्या आणि जवळच्या शाळेत प्रवेश मिळू शकणार आहे. केरळच्या माडपल्ली शाळेच्या सहशिक्षण प्रणाली प्रस्तावाला केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या निर्णयाला मंजुरी दिली. शाळेत सहशिक्षण प्रणाली लागू करण्याचा निर्णय शाळा पीटीए आणि शिक्षकांनी एकत्रितपणे घेतला होता. १९२० मध्ये या शाळेची स्थापना माडपल्ली सरकारी मत्स्य विद्यालय म्हणून करण्यात आली. पुढे विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असल्याने त्याचे रूपांतर दोन शाळांमध्ये करण्यात आले. एक शाळा मुलांसाठी आणि दुसरी शाळा मुलींसाठी बांधण्यात आली होती. काही वर्षांनंतर या दोन शाळांचा दर्जा वाढवण्यात आला. त्यानंतर ते माडपल्ली सरकारी व्यावसायिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि माडपल्ली सरकारी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय म्हणून ओळखले जाऊ लागले. मुलींच्या शाळेत मुलांना प्रवेश दिला जावा अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर हा निर्णय झाला. आता अशाप्रकारे सर्वच शाळांमध्ये सहशिक्षण प्रणाली का लागू करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशा आंदोलनांना आणि लोकांच्या मागण्यांना पाठिंबा देणे हे एलडीएफ सरकारचे कर्तव्य आहे असे केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी म्हणाले. जेंडर जस्टिस, जेंडर इक्वालिटी आणि जेंडर अवेयरनेसच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल असल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ImyOFW
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Gender Equality in School: १०० वर्ष जुन्या मुलींच्या 'या' शाळेत मुलांनाही मिळणार प्रवेश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel