TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Government job: DRDO मध्ये विविध पदांची भरती, दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News

DRDO : दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया (Defence Research and Development Organisation, DRDO)मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. डीआरडीओच्या टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळाच्या अंतर्गत (TBRL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. डीआरडीतर्फे यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव, अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशली नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखालीनोटिफिकेशनची थेट लिंक देण्यात आली आहे. पदांचा तपशील डीआरडीओच्या प्रशिक्षणार्थी पदांअंतर्गत ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल, टूल मेकॅनिक, मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम, मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी), आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले, घरकाम करणारा, फिटर, मशीनिस्ट, टर्नर, सुतार, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटार वाहन), वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA), डिजिटल छायाचित्रकार, सचिवीय सहाय्यक लघुलेखक (हिंदी) पदाची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक अर्हता पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि आयीआयचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. पगार या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदानुसार वेगवेगळा पगार मिळणार आहे. अप्रेन्टिस, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) , मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल, टूल मेकॅनिक, मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम आणि मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) या पदांसाठी ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे. आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले, घरकाम, संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA, डिजिटल फोटोग्राफर, सेक्रेटरियल असिस्टंट, हिंदी टायपिस्ट या पदासाठी ७ हजार ७०० रुपये पगार दिला जाणार आहे. फिटर, मशीनिस्ट, टर्नर, सुतार, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटार वाहन) आणि वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे. महत्वाची कागदपत्रे उमेदवारांनी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साइझ फोटो ही कागदपत्र जोडावी लागणार आहेत. अंतिम तारीख इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d9gtxJ
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या