Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-12-14T09:00:49Z
Rojgar

Government Job: राज्याच्या ECHS विभागात भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार

Advertisement
ECHS Recruitment 2021: महाराष्ट्र सरकारच्या एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ( Health Scheme )अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन (Maharashtra ECHS Cell Recruitment 2021) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या पदभरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist, प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician), फार्मासिस्ट (Pharmacist, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist), महिला परिचर (Female Attendant), सफाईवाला (Safaiwala) ही पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे एमबीबीएसची डिग्री आणि संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ७५ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. वैद्यकीय विशेषज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं एमडी किंवा एमएस पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख रुपये पगार दिला जाणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक उमेदवाराचं DMLT पर्यंत शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी २८ हजार १४४ रुपये पगार दिला जाणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे बीएससीपर्यंत शिक्षण आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांना २८ हजार १४४ रुपये पगार दिला जाणार आहे. फार्मासिस्ट पदासाठी उमेदवाराचे शिक्षण बी फार्मपर्यंत असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २८ हजार १४४ रुपये पगार दिला जाणार आहे. डेंटल हायजेनिस्ट पदासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा आणि अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी २८ हजार १४४ रुपये पगार दिला जाणार आहे. फिमेल अडेंडंट उमेदवारांकडे किमान शिक्षण असणं आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराला १६ हजार ८०० रुपये पगार दिला जाईल. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडे रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र,पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज OIC, स्टेशन मुख्यालय अहमदनगर (ECHS सेल) या पत्त्यावर पाठवायचा आहे. १७ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/government-job-recruitment-in-echs-department-of-the-state-salary-up-to-1-lakh/articleshow/88272756.cms