Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-17T07:00:23Z
Rojgar

Government Job: NBCC मध्ये विविध पदांती भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
BCC Recruitment 2021: एनबीसीसी इंडिया (NBCC India) मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. भारतातील नऊ रत्न कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या एनबीसीसी इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ()अनेक पदांची भरती केली जाणार आहे. एनबीसीसी इंडियातर्फे पदभरती संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण ७० पदे भरली जाणार आहेत. रिक्त जागा तपशील NBCC India ने जारी केलेल्या नोटिफिकेशनननुसार, एकूण ७० पदांची भरती केली जाईल. यामध्ये डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलच्या १० जागा भरण्यात येणार आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिलसाठी ४० पदांसाठी भरती होणार आहे. येथे मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिकलच्या १५ जागा भरण्यात येणार आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल बॅकलॉगमध्ये एक पद आणि सीनियर स्टेनोग्राफर बॅकलॉगमध्ये एक पद भरण्यात येणार आहे. ऑफिस असिस्टंटसाठी ३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. संपूर्ण रिक्त जागांचा तपशील अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. NBCC Recruitment 2021: असा करा अर्ज स्टेप १- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- nbccindia.in वर जा. स्टेप २- वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या रिक्रूटमेंट विभागात जा. स्टेप ३- आता 'NBCC India Various post Recruitment Online Form 2021' या लिंकवर जा. स्टेप ४- यामध्ये 'Apply Online' या पर्यायावर क्लिक करा. स्टेप ५- आता मागितलेला तपशील भरून नोंदणी करा. स्टेप ६- नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता. पात्रता विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील वेगळी असणार आहे. डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीटेक (B.Tech)इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग)मध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बी.टेक पदवी (सिव्हिल इंजिनीअरिंग) असावी. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी असणे अनिवार्य आहे. एनबीसीसी इंडियाद्वारे रिक्त पदांसाठी () जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज प्रक्रिया९ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. यामध्ये ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ८ जानेवारी २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची तीच अंतिम तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nbcc-recruitment-2021-vacancy-for-many-posts-including-management-trainee-know-how-to-apply/articleshow/88333541.cms