
NCL Apprentice Recruitment 2021: आठवी आणि दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडद्वारे (NCL Recruitment) अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी (Apprentice Recruitment Notification) नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या नोटिफिकेशननुसार एकूण १२९५ पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार एनसीएलची अधिकृत वेबसाइट nclcil.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांना २० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांवर भरती एकूण १२९५ रिक्त पदांच्या भरती अंतर्गत (NCL Aprrntice) वेल्डर आणि इलेक्ट्रिशियनसाठी ८८ जागा, इलेक्ट्रिशियनच्या ४३० जागा, फिटरच्या ६८५ जागा आणि मोटार मेकॅनिकसाठी ९२ जागा भरण्यात येणार आहेत या रिक्त पदांचा सविस्तर तपशील नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये जाहीर करण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण पदांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांच्या एकूण ६३८ जागा भरल्या जाणार आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी १९९ जागा, एससी प्रवर्गासाठी १८१ जागा आणि एसटी प्रवर्गासाठी २७७ जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता वेल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे इलेक्ट्रीशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. फिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मोटर मेकॅनिक पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारअर्ज करू शकतात. तसेच त्यांच्याकडे आयटीआय पास प्रमाणपत्र असए आवश्यक आहे. वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त आणि २४ वर्षांपेक्षा कमी असावे. त्याचबरोबर आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणीनंतर नियुक्त केले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3djNt6H
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या