TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Government job: मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती, दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News

Central : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वेतर्फे विविध पदांची भरती केल जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. मध्य रेल्वेतर्फ मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागांमध्ये लेव्हल १ आणि लेव्हल २ च्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्ड, मध्य रेल्वेने दिलेल्या भरती जाहिरातीनुसार २०२१-२२ च्या रिक्त पदांसाठी स्काउट्स आणि गाईड कोट्याअंतर्गत दोन्ही श्रेणीतील एकूण १२ पदांची भरती केली जाणार आहे. तसेच लेव्हल १ पदांसाठी उमेदवारांनी दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लेव्हल १ साठी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षांदरम्यान असावे. लेव्हल २ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह किंवा कोणत्याही समकक्ष पात्रतेसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. लेव्हल २ च्या पदांसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. अधिक तपशिलांसाठी आणि इतर भरती संबंधित तपशीलांसाठी मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन पाहावे लागणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल रेल्वे रिक्रूटमेंट सेलची अधिकृत वेबसाइट rrccr.com वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सोमवार ६ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली असून उमेदवार २० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल.ऑनलाइन माध्यमातून हे शुल्क भरता येणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार अर्ज शुल्कात सवलत देण्यात येईल. एससी, एसटी, दिव्यांग, महिला आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31Aclor
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या