Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१, डिसेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-10T14:45:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job: नॅशनल फर्टीलायझर्समध्ये भरती, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
2021: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये मार्केटिंग आणि एचआरमधील मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती केली जात आहे. याची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निवड प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये परीक्षेचे शहर आणि तारीख तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडतर्फे तात्पुरते प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. एनएफएलमध्ये (HR or Marketing) पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कंपनीची अधिकृत वेबसाइट nationalfertilizers.com वर जाऊन प्रवेशपत्र पाहता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. NFL Admit Card: असे करा डाऊनलोड नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग आणि एचआर) या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अंतिम प्रवेशपत्र अद्याप जाहीर करण्यात आले नाही. NFL ने जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार उमेदवारांना १३ डिसेंबर २०२१ पासून त्यांचे एमटीए अंतिम प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना एनएफएल एमटी अंतिम प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवरील करिअर विभागात जावे. प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवर नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा फोन नंबर किंवा उमेदवार आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगिन करा. त्यानंतर प्रवेश डाउनलोड आणि प्रिंट करा. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने मार्केटिंग आणि ह्यूमन रिसोर्स विभागांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या भरतीसाठी २ नोव्हेंबर रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. या पदांसाठी ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरु होती. यानंतर आता मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ऑनलाइन परीक्षा १६ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31IYITS
Source https://ift.tt/310mqee