Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-12-08T08:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job: पदवीधरांना नीती आयोगासोबत काम करण्याची संधी Rojgar News

Advertisement
Recruitment: भारत सरकारच्या (India Government) अंतर्गत येणाऱ्या नीती आयोगामध्ये (National Institute of Transforming India, NITI Aayog) इंटर्नशीप करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. हे भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणांसाठी थिंक टँक म्हणून काम करते. पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, वयोमर्यदा, कामाचा भत्ता, अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नीती आयोगामध्ये इंटर्नशीप (Niti Aayog ) करण्यासाठी उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नीती आयोगामधील विविध विभागांच्या आणि युनिट्समध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे. तसेच त्यांना इम्पेरिकल कलेक्शन आणि कलेक्शन इन हाऊस याद्वारे माहिती गोळा करण्याचे काम देण्यात येईल. पदवीच्या दुसऱ्या किंवा चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेले विद्यार्थी इंटर्नशीप पदासाठी अर्ज करु शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान ८५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी अर्ज करता येणार आहे. रिसर्च किंवा पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये ७० टक्केंपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केलेले किंवा अंतिम परीक्षा देणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. बातमीखाली अधिकृत वेबसाइट आणि अर्जाची थेट लिंक देण्यात आली आहे. वेबसाइटवरील इंटर्नशीपच्या लिंकवर क्लिक केल्यावर अर्ज खुला होईल. यामध्ये मागितलेला संपूर्ण तपशील भरावा आणि पाहिजे असलेली फिल्ड निवडावी. उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. अर्जासोबत जोडलेल्या महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यातून उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास इंटर्नशीप रद्द केली जाऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IvBKQF
Source https://ift.tt/310mqee