Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-12-15T13:01:04Z
Rojgar

Government Job: कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
ESIC : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन(Employees State , ESIC) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या () कर्मचारी राज्य विमा निगम, श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत (Employees State Insurance Corporation, Ministry of Labor and Employment) ही भरती केली जाणार आहे. या भरतीतून देशभरातील विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये ग्रेड २ पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण ११२० पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या भरती नोटिफिकेशननुसार, ग्रेड २ च्या विमा वैद्यकीय अधिकारी (Insurance Medical Officer,IMO) पदांवर भरती केली जात आहे. त्यापैकी ४५९ पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. ओबीसीसाठी ३३ पदे, एससीची १५८ पदे, एसटीची ८८ पदे आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ११२ पदे राखीव आहेत. अर्ज प्रक्रिया इच्छुक आणि पात्र उमेदवार कर्मचारी राज्य विमा महामंडळाची अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. ईएसआयसी भरती २०२१ नोटिफिकेशननुसार ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांचा अर्ज सबमिट करता येणार आहे. अर्ज शुल्क उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. एससी, एसटी, दिव्यांग, माजी कर्मचारी, महिला आणि विभागीय उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे. पात्रता इएसआयसी ने ११२० पदांच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा ३१ जानेवारी २०२२ रोजी उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना केंद्राच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/esic-recruitment-various-post-vacant-in-employees-state-insurance-corporation-has-released-the-recruitment-apply-online/articleshow/88297210.cms