Government Job: मुंबई उच्च न्यायालयात भरती, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Government Job: मुंबई उच्च न्यायालयात भरती, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Mumbai High Court Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आह. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण २४७ जागा भरण्यात येणार आहेत. असा करा अर्ज लिपिक भरती २०२२ ( Mumbai High Court Clerk Recruitment 2022) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जा. त्यातील भरती सेक्शनवर क्लिक करा. लिपिक पदांसाठी नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जाची लिंक येथे देण्यात आली आहे. शुल्क उमेदवारांनी हे नोटिफिकेशन डाउनलोड करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्जादरम्यान उमेदवारांनी २५ रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांची यादी वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. पात्रता निकष मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती २०२२ नोटिफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे कॉम्प्युटर बेसिक टायपिंग, इंग्रजी टायपिंगमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. उमेदवारांचा टायपिंगचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट असावा. वयोमर्यादा अर्जाच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे. शेवटची तारीख या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार २३ डिसेंबर २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिपिक भरतीसाठी उमेदवारांना ६ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/bombay-high-court-recruitment-clerks-post-vacant-in-bombay-high-court-graduate-candidates-apply-online-from-today/articleshow/88452572.cms

0 Response to "Government Job: मुंबई उच्च न्यायालयात भरती, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel